सेक्युलॅरिझमचा अर्थ
एकनाथांचे तत्त्वज्ञान हे धर्माधर्मांमधील सामंजस्य वाढून त्यांच्यात संवाद प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या संवाद सामंजस्यासाठी ते या दोन्ही धर्मांची गुळमुळीत तरफदारी करीत नाहीत. त्यांच्यातील मूलतत्त्ववादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देत नाहीत. आपल्या संविधानातील सेक्युलॅरिझम या तत्त्वाची ओढाताण करीत बुद्धिवाद्यांनी त्याचा धर्मउच्छेदक अर्थ लावला तर सर्वधर्मसमभाववाद्यांनी त्याचा अर्थ शासनाने धर्मांत साक्षेप न करता सर्व …